आॅनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:56 PM2018-10-01T13:56:06+5:302018-10-01T13:56:24+5:30

मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. 

Close the website for online registration; Inconvenience to farmers | आॅनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

आॅनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

Next

- बबन देशमुख
मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. 
विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यातच नवीन शेतमाल बाजारात आला की बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकºयांना येत आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडद्वारे खरेदी केंद्रांवर शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने मूगाला ६९७५ रुपये, उडीद ५६०० आणि सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. मानोरा तालुक्यात आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मूग, उडीद या शेतमालासाठी २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर अशी मुदत आहे तर सोयाबीनसाठी १ ते ३१ आॅक्टोबर अशी मुदत आहे. सर्व खरेदी आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संकेतस्थळच बंद असल्याने आॅनलाईन नोंदणीपासून तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तांत्रिक बिघाड दूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मूग व उडीद शेतमालाच्या नोंदणीची अंतिम मुदत जवळ येत असतानाही आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. यासंदर्भात मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने यांनी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देत आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी केलेली आहे.

Web Title: Close the website for online registration; Inconvenience to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.