उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांना पटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:56+5:302021-02-11T04:42:56+5:30
विज्ञान, कला व वाणिज्य या अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यवसाय अभ्यासक्रमावरही भर देण्यात देतो. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी वाशिमसह राज्यात ...
विज्ञान, कला व वाणिज्य या अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यवसाय अभ्यासक्रमावरही भर देण्यात देतो. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी वाशिमसह राज्यात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यात जवळपास आठ खासगी अनुदानित संस्था असून, यामध्ये जवळपास ६४० च्या आसपास विद्यार्थी संख्या असते. दरम्यान, केंद्र सरकारने अनुदान देणे बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम आता आयटीआयमध्ये विलीन केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून, ते कला, वाणिज्य, विज्ञान शाखेकडे वळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
०००
अन्य अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी वळतील
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद केल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. वाशिम येथे एकच शासकीय आयटीआय काॅलेज आहे. येथे प्रवेश क्षमताही जास्त नाही. त्यामुळे यापूर्वी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांचे समायोजन कुठे होणार हा प्रश्न आहे; शिवाय दरवर्षी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम निवडणारे विद्यार्थी आता अन्य अभ्यासक्रमाला पसंती देतील, असा अंदाज संस्थाचालक व विद्यार्थ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.
०००
एकिकडे व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जात आहे तर दुसरीकडे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद केल्याने पर्यायाने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान द्यावे. यावर ठोस तोडगा काढण्यात यावा.
- प्रा. अरूणराव सरनाईक
उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम
०००
विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे असे सांगितले जाते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या संस्थांचे जाळेही निर्माण करण्यात यावे. वाशिमसारख्या जिल्हयात अगोदरच व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था अत्यल्प आहेत.
- प्रा. प्रकाश कापूरे
अध्यक्ष, जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डव्हा ता. मालेगाव
०००
व्यावसायिक शिक्षण म्हणून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाला पसंती दिली जात होती. आता आयटीआयमध्ये हा अभ्यास विलीन केला जाणार असल्याने याकडे विद्यार्थी पूर्वीसारखे मोठ्या संख्येने जाणार नाहीत.
- प्रज्वल तायडे,
विद्यार्थी, वाशिम
००००
शासनाकडून व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येते. असे असतानाही उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृृष्टिकोनातून नुकसानदायक म्हणावा लागेल. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू ठेवावा.
- वैभव कांबळे, विद्यार्थी,