पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण; रब्बी पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:35 PM2020-02-07T16:35:22+5:302020-02-07T16:36:03+5:30
अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम वºहाडात दाट धुके व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळाळी बहुतांश भागात अवकाळी पाऊसही पडला. त्यामुळे रब्बी पिके संकटात सापडली आहेत. लागोपाठच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात मिळून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ३ लाख ६२ हजार ४१२ हेक्टर असताना या तिन्ही जिल्ह्यात मिळून यंदा ४ लाख ५६ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ७० हजार ५१२ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ९६ हजार ४९२ हेक्टर, तर अकोला जिल्ह्यात ८९ हजार २२४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अर्थात यंदा पश्चिम वºहाडात रब्बी पिकांचे क्षेत्रत सरासरीपेक्षा जवळपास ९२ हजार हेक्टरने वाढले आहे. त्यात ही पिके बहरात असताना शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाचीही आशा वाटू लागली होती; परंतु गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विविध किडींमुळे ही पिके संकटात सापडली आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील काही गावांत गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागानेही पुढील दोन दिवसांत पश्चिम वºहाडात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.