सोयाबीन बियाणे तक्रारींची वास्तवता जाणून घ्या - महाबीज कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:19 PM2020-07-18T17:19:05+5:302020-07-18T17:19:37+5:30
मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या लाखो तक्रारी करण्यात येत आहेत. यावरून कृषी विभाग पोलिसांत गुन्हे दाखल करीत असल्याने महाबीज कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत आहे. या पृष्ठभूमीवर १४ जुलै रोजी महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे.
कोरोना विषाणू संकटाच्या काळात महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाकडून खरिप हंगाम २०२० मध्ये ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पेरणीकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५३११२ बिजोत्पादकांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनची चाचणी करुन घेतली आहे. आता राज्यात अनेक भागातील शेतांमध्ये सोयाबीन बियाणे न उगविल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याने यासंदर्भात कोणतीही चौकशी न होता सरळ एफआयआर दाखल होत आहेत. याकरिता महाबीज कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे. त्यामध्ये राज्यातील किती शेतकºयांना आतापर्यंत कशाप्रकारे बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला यासंदर्भात कल्पना दिली आहे. त्यानुसार राज्यातील ३ लाख क्विंटल सोयाबीनचा शेतकºयांना खरिप हंगामात पुरवठा केल्याचे म्हटले आहे.
राज्यात महाबीजच्या बियाण्यांबाबत होत असलेल्या तक्रारींचा ओघ वाढतच आहे. बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्षात हा प्रकार का घडला. हे जाणून घेणे आवश्यक असल्याने कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
- डॉ. प्रशांत घावडे
जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम