वाशिमच्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांनी केले ई-लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:46 PM2020-10-11T12:46:02+5:302020-10-11T12:46:53+5:30

Washim, Chief Minister Uddhav Thackeray जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण.

CM Uddhav Thackeray e-Enaguration of RT-PCR laboratory in Washim | वाशिमच्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांनी केले ई-लोकार्पण

वाशिमच्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांनी केले ई-लोकार्पण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. १० आॅक्टोबर रोजी वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. जिल्हा नियोजन समितीमार्फत आरटी-पीसीआर प्रयोगशाळेसाठी २ कोटी रुपये, औषधे खरेदीसाठी ३ कोटी ६० लाख रुपये, आॅक्सिजन सुविधेसाठी ४६ लाख रुपये, रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटसाठी ९९ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

 

 

Web Title: CM Uddhav Thackeray e-Enaguration of RT-PCR laboratory in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.