आचारसंहितमुळे घंटागाड्याची निविदा प्रक्रिया रखडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:47+5:302021-01-08T06:09:47+5:30
शहरातील नागरिकांकडून घंटागाड्या आणि अग्निशमन कर वसूल करण्यात आला. स्वच्छ आणि सुंदर मालेगावकरिता शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. ...
शहरातील नागरिकांकडून घंटागाड्या आणि अग्निशमन कर वसूल करण्यात आला. स्वच्छ आणि सुंदर मालेगावकरिता शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून मागील कंत्राटदाराचा करार संपल्याने काही दिवस गाड्या जागेवर उभ्या होत्या. त्यानंतर नगरपंचायतीने त्या स्वत: चालविल्या. त्यामागे चालकाचा खर्च, दुरुस्ती, डिझेल, ट्रॅक्टर वगैरे सर्व खर्च जनतेकडून वसूल केलेल्या करातून केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने घंटागाड्याची निविदा प्रक्रिया रखडली आहे. मध्यंतरी घंटागाड्या बंद होत्या. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरच कचरा टाकायला सुरुवात केली होती. नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया राबवून घंटागाड्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष रेखा अरुण बळी म्हणाल्या की, नगर पंचायतीने निविदा प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी. नादुरुस्त गाड्या दुरुस्त करून कचरा संकलन करावे. या संदर्भात संबंधितांना सूचना दिल्या जातील.