सर्दी, खोकल्याची साथ; नागरिक हैराण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:05+5:302021-09-16T04:52:05+5:30
०००००००००००००००० भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या कधी मिळणार? वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या नियमित मिळत ...
००००००००००००००००
भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या कधी मिळणार?
वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या नियमित मिळत नाहीत. पावत्या नियमित मिळत नसल्याने शिक्षकांत राेष दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी बुधवारी वित्त विभागाकडे केली आहे.
००००००
वाहनचालकांवर कारवाईचा धडाका
वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या जागमाथा येथे पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी केल्याचे बुधवारी दिसून आले. यात ३२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
०००००००
कंत्राटदाराची हलगर्जी; शेतजमिनीचे नुकसान
वाशिम : महामार्गालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कंत्राटदाराने नाली न खोदल्याने इंझोरी परिसरात शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी यापूर्वीच मानोरा तहसीलदारांकडे भरपाईची मागणी केली होती. १५ सप्टेंबरपर्यंतही भरपाई मिळाली नाही.
००००००००००००
मानोरा तालुक्यातील धरणावर वाढली झुडपे
वाशिम : मानोरा तालुक्यातील बहुतांश धरणाच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढले असून मुळे खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे धरणावरची ही झुडपे तोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी जलसंधारण विभागाकडे केली.
००००००
रिठद परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती
वाशिम : रिठद परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नारायण आरू यांनी बांधकाम विभागाकडे बुधवारी केली.
०००००
शिरपूर परिसरात अवैध रेती वाहतूक
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून शिरपूर परिसरातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तालुका प्रशासनाकडे बुधवारी केली आहे. अधुनमधून कारवाई करण्यात येते. परंतु, कारवाईची मोहीम नियमित नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.
००००००००
पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला
वाशिम : भर जहागीर, डही, चिखली आदी परिसरातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
०००००
कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी
वाशिम : गेल्या १६ महिन्यांपासून प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी लोककलावंत संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन केले. मात्र, याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १५ सप्टेंबर रोजी केली आहे.
०००००००
वेतन आयाेगाचा लाभ केव्हा मिळणार?
वाशिम : महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला सेवान्तर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या रद्द केलेल्या शासन आदेशाद्वारे सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, अशी मागणी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. लाभ केव्हा मिळणार? याकडे संघटनेचे लक्ष लागून आहे.