तहसील कार्यालयात फेकून दिले निकृष्ट गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:03 AM2017-07-19T01:03:35+5:302017-07-19T01:03:35+5:30
मालेगाव : रेशनचे निकृष्ट आलेले गहू मालेगाव शहरातील काही नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालयात आणून फेकून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : रेशनचे निकृष्ट आलेले गहू मालेगाव शहरातील काही नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालयात आणून फेकून दिले. मालेगाव शहरात रेशन दुकानदारांकडून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत आहे. वारंवार सांगूनही निकृष्ट गहू येत असल्याचे पाहून संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास निकृष्ट दर्जाचे गहू सोबत आणून तहसील कार्यालयात फेकून दिले. तहसीलदार राजेश वझिरे यांना आपबिती सांगण्याचा प्रयत्न केला असता, मिटींग असल्याचे सांगून तहसीलदारांनी वेळ मारून नेली. निकृष्ट गहू यापुढे स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला.