थंडीचा कडाका वाढला; वाशिम हरविले धुक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 02:19 PM2020-01-04T14:19:10+5:302020-01-04T14:19:40+5:30

डिसेंबर महिन्यात पाहिजे तशी थंडी नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा चांगलाच जोर वाढला.

The coldness increased; Dence fog cover Washim city | थंडीचा कडाका वाढला; वाशिम हरविले धुक्यात 

थंडीचा कडाका वाढला; वाशिम हरविले धुक्यात 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून वाशिमचा पारा घसरला आहे. थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहर व परिसरातील रस्ते धुक्यात हरविल्यासा आभास होत आहे. यामुळे वाहनधारकांना दिवस उजाडल्यानंतरही दिवे लावून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.
डिसेंबर महिन्यात पाहिजे तशी थंडी नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा चांगलाच जोर वाढला. तापमानात घट होऊन थंडीचा जोर कायम असून गुरुवारी रात्री ९.३० वाजतापासूनच संपूर्ण शहर धुक्यात गडप झालेले दिसून आले. १०० मिटर अंतरावरीलही या धुक्यामुळे काही दिसेनासे झाले होते. थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार बोलत असले तरी धुक्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गत ५ ते ६ दिवसांपासून वातावरणात परिणामकारक बदल झाला असून दिवसागणिक वाढत चालेली थंडी, सकाळ व सायंकाळच्या सुमारास पडत असलेले धुके आणि ढगाळी वातावरणामुळे गहू, हरभरा, कपाशी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसत आहे. यामुळे नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीस आले.
वाशिम परिसरात दिवसागणिक थंडीचे प्रमाण वाढतच चालले आहे. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून तुरळक स्वरूपात पावसाच्या सरीही कोसळत आहेत. यामुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, गहू, कपाशी, कांदा आणि भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. प्रतिकुल हवामानामुळे तुरीचे बहरलेले पीक सुकत असून हरभरा पिकावर जळ व मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा आणि भाजीपाला पिकावरही करपा व मर रोग ओढवला आहे. हायब्रीड ज्वारी आणि मका पिकावरही यावर्षी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकूणच या सर्व विपरित परिस्थितीमुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.शहरात पडलेल्या धुक्यांचा आनंद नागरिक घेताना दिसून येत आहेत.  

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी घेतला धुक्याचा आनंद
वाशिम शहरातून दररोज शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी विविध भागात फिरतांना दिसून येतात. धुके पडल्याने नागरिकांची संख्या कमी होईल असे चित्र असतांना दररोजपेक्षा यामध्ये मात्र गर्दी दिसून आली. संपूर्ण शरीर गरम कपडयांनी झाकून नागरिकांनी मॉर्निग वॉकला येऊन पडलेल्या धुक्याचा आनंद घेतला. अनेकांनी तर असे धुके शहरात प्रथमच पडल्याचे सांगितले.

Web Title: The coldness increased; Dence fog cover Washim city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.