पालिका कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:12 AM2017-08-10T01:12:38+5:302017-08-10T01:12:56+5:30

वाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित  मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम,  कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा  नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी  कर्मचारी, सफाई कामगारांनी सहभागी होत आंदोलनाचा पहिला ट प्पा म्हणून बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा  आंदोलन करण्यात आले. 

Collective leave agitation of municipal corporation! | पालिका कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन!

पालिका कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन!

Next
ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी ‘एल्गार’चार नगर परिषद, दोन नगरपंचायतींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित  मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम,  कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा  नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी  कर्मचारी, सफाई कामगारांनी सहभागी होत आंदोलनाचा पहिला ट प्पा म्हणून बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा  आंदोलन करण्यात आले. 
शासनाने कर्मचारी मागण्यांच्या बाबतीत वेळकाढूपणा व उदासीनतेचे  धोरण अवलंबिले असून, इतरही अनेक चुकीच्या निर्णयांमुळे  कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रलंबित मागण्या पूर्ण करणे  आणि न्यायोचित हक्क मिळविण्याकरिता संबंधितांनी टप्प्याटप्प्याने  आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात  सामूहिक रजा आंदोलन होत असून, दुसर्‍या टप्प्यात १0 ते १४  ऑगस्टदरम्यान काळ्या फिती लावून काम करणे, १५ ऑगस्ट रोजी  पालकमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर करणे, २१ ऑगस्टपासून  बेमुदत कामबंद आंदोलन करीत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात  आल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वल देशमुख  यांनी दिली. आजच्या आंदोलनात कारंजा शाखेचे अध्यक्ष इलियास  अहमद, मुकूंद लोखंडे, रिसोड शाखेचे अध्यक्ष माणिक भागवत, प्र तापराव देशमुख, मंगरुळपीर शाखेचे अध्यक्ष राजेश खंडेतोड, दिनेश  व्यास, वाशिम शाखेचे अध्यक्ष बबनराव भांदूर्गे, नाजिम मुल्लाजी,  संजय काष्टे, मालेगाव नगर पंचायत शाखेचे अध्यक्ष गणेश भालेराव,  महादेव राऊत, सय्यद इरफान सय्यद गुलाम, तर मानोरा नगर पंचायत  शाखेचे अब्दुल वहाब तसेच वाशिमचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे,  रिसोडचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, मंगरुळपीरचे मुख्याधिकारी  एस.एन. वाहुरवाघ, कारंजाचे मुख्याधिकारी प्रमोद वानखडे,  मालेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे व मानोरा नगर  पंचायतचे मुख्याधिकारी माळकर, न.प. सफाई कर्मचारी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नंदू पवार, राजू मलिक, जितू बढेल, किशोर समुद्रे  यांच्यासह जिल्हय़ातील न.प.चे सर्व कर्मचारी, सफाई कामगार यांनी  सहभागी झाल्याने आंदोलन १00 टक्के यशस्वी झाल्याचा दावा  कर्मचारी संघटनेने केला आहे. 

Web Title: Collective leave agitation of municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.