जिल्हाधिकारी पोहचले बांधावर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:11 PM2019-11-06T12:11:42+5:302019-11-06T12:14:16+5:30
जिल्हाधिकाºयांनी प्रत्यक्ष बांधावर पोहचून पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी नुकसानाचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी मंगळवारी दिल्या. वाशिम तालुक्यातील सुराळा, कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकाºयांनी प्रत्यक्ष बांधावर पोहचून पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. पंचनामे अचूक होण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी झालेल्या काही पंचानाम्यांची पडताळणी देखील केली.
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. याकरिता तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामस्तरीय अधिकाºयांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. तसेच पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नुकसानग्रस्त पिकाची भरपाई शेतकºयास मिळावी, यासाठी सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. सुराळा शिवारातील विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील कापणी केलेले सोयाबीन, गोपाल चौधरी यांच्या शेतातील कापूस पिकासह इतर शेतकºयांच्या शेतांमधील कापणी झालेल्या व शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जिल्हाधिकारी मोडक यांनी केली. तसेच कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांचाही पाहणी करण्यात आली.
(प्रतिनिधी)