जिल्हाधिका-यांनी केली शेडनेटची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:08 PM2017-10-03T20:08:27+5:302017-10-03T20:08:41+5:30

वाशिम :  रिसोड तालुक्यातील व्याड येथील शेडनेटमधील शिमला मिरची व काकडी लागवडची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

Collector Shadenet survey | जिल्हाधिका-यांनी केली शेडनेटची पाहणी

जिल्हाधिका-यांनी केली शेडनेटची पाहणी

Next
ठळक मुद्देव्याड येथील शेडनेटमधील शिमला मिरची व काकडी लागवडची केली पाहणीजगन्नाथ बोरकर व विष्णु सपकाळ यांनी शेडनेटमध्ये लावली शिमला मिरची व काकडी 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  रिसोड तालुक्यातील व्याड येथील शेडनेटमधील शिमला मिरची व काकडी लागवडची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.
व्याड येथील अल्पभुधारक शेतकरी जगन्नाथ पंढरी बोरकर व विष्णु सपकाळ यांनी क ृषी विभागामार्फत २०१३ -१४ ला उभारणी केलेल्या शेडनेटमध्ये लावलेल्या शिमला मिरची व काकडी पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकºयांनी पारंपारीक शेती सोडुन उच्च तंत्रज्ञान अवगत करुन शासनाच्या नियमानुसार  पिकाची निगा राखुन  मिरची व काकडी पासून ०.२० हे. हे क्षेत्रातुन भरघोस उत्पादन काढुन १.५० ते २ लाख रुपये नफा मिळविला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी शेतकºयाचे अभिनंदन केले. 
व्याड येथील अल्पभुधारक शेतकºयांच्या गटांनी शेडनेट घेवुन  त्यापासून  आपल्या वार्षीक उत्पन्नात व राहनीमानात झालेल्या  अमुलाग्र बदलाच्या गावातील व परिसरातील शेतकºयांनी आदर्श घ्यावा,  तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतुन  आवश्यक त्या शेतकºयांनी शेततळे घेवुन संरक्षीत  ओलीताची सोय करुन घ्यावी असे आवाहन केले. 
 सदर भेटीचे वेळी जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे संचालक डॉ.डी.एल.जाधव, तालुका कृषी अधिकारी आर.एच.ताबिंले,  कृषी पर्यवेक्षक राखोंडे,  कृषी सहाय्यक चवरे, तडस उपस्थित होते. 
तसेच शेतकरी  पंढरी बोरकर, त्र्यंबक बोरकर,  रघुनाथ बोरकर, पांडूरंग चौधरी, कैलास बोरकर, अनिल बोरकर, गजानन बोरकर, रामप्रसाद बोरकर, सुनिल बोरकर, पंकज चौधरी यांनी क्षेत्रभेटीसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Collector Shadenet survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.