२८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:17 PM2021-02-14T17:17:33+5:302021-02-14T17:17:45+5:30
Colleges will remain आॅनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला.
वाशिम : पाचवी ते बारावीनंतर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार होती. परंतू, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंदच राहणार आहे. पूर्वीप्रमाणेच २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयीन आॅनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला.
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. या दरम्यान जिल्ह्यातील एकाही विद्याथ्यार्ला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पाचवी ते बारावीनंतर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यापूर्वीच केली. जिल्ह्यात अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित एकूण २६ महाविद्यालये असून, २४ हजारांवर विद्याथीर्संख्या आहे. जिल्ह्यात महाविद्यालये सुरू करण्याचे पूर्वनियोजन केले जात असतानाच, कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख उंचावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी काढला. त्यानंतर कोरोनाविषयक परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.