१६ हजारांवर मतदारांचे रंगीत छायाचित्र अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:28+5:302021-02-27T04:55:28+5:30
वाशिम-मंगरूळपीर, मालेगाव-रिसोड आणि कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलित करून त्या-त्या तहसील कार्यालयात जमा ...
वाशिम-मंगरूळपीर, मालेगाव-रिसोड आणि कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलित करून त्या-त्या तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश मतदान केंद्र्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना देण्यात आले होते. दरम्यान, मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची पडताळणी करून त्यांचे रंगीत छायाचित्र संकलित करण्यासाठी त्यांच्या नावाचा जाहीरनामा तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, रिसोड-मालेगाव मतदारसंघात ५ हजार ६३८, वाशिम-मंगरूळपीरमध्ये ८ हजार ९६२ आणि कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील ८४३ मतदारांची छायाचित्रे मतदार याद्यांमध्ये नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
...............
१६,१४३
मतदार यादीत छायाचित्र नसलेले एकूण मतदार
५,६३८
रिसोड-मालेगाव मतदारसंघ
८,९६२
वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघ
८४३
कारंजा-मानोरा मतदारसंघ
......................................
कोट :
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसात संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेकडे जमा करावा; अन्यथा नमूद मतदार वास्तव्यास नसल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- विजय साळवे
तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, वाशिम