‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:52 AM2017-08-11T01:52:20+5:302017-08-11T01:52:53+5:30

वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.

'Come, get dinner, fill it all!' | ‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

Next
ठळक मुद्देउरलेले अन्न गरजूंना राजरत्न संस्थेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.
अनेक परिवार लग्नसमारंभातील शिल्लक राहिलेले अन्न या संस्थेला बोलावून देत असल्याने सर्वांना अन्न बचतीचे महत्त्व पटत असल्याचे चित्र आहे. यासाठी संस्थेचे प्रतिनिधी अन्न बचतीसह लग्नसमारंभ, पाटर्य़ा, वास्तू पूजन, विविध कार्यक्रमातील उरलेले अन्न घेऊन गजरवंत लोकांना नेऊन देत आहेत. 
संस्थेच्या या कामात लोकसहभाग वाढत असून, इतर जिल्हय़ातसुद्धा याविषयी जनजागृतीचे काम संस्थेने हाती घेतले आहे. 
जगामध्ये अन्नावाचून मृत्यूचे प्रमाण इतर सर्व मृत्यूच्या तुलनेत जास्त असून, भविष्यात अन्न वाचून राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, याकरिता वेळीच सजग होऊन अन्न बचत करण्याकरिता सर्व स्तरातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न घटत आहे. याकरिता भावी पिढीला अन्नटंचाईला सामोरे न जाण्याकरिता अन्न बचत काळाची गरज असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी पटवून देत आहेत. संस्थेच्या या कार्यात विनोद पट्टेबहादूर , महादेव क्षीरसागर, अरविंद उचित, भगवान ढोले, विकास  पट्टेबहादूर, संतोष हिवराळे, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, गणेश घेवारे, हंसिनी उचित, सोनल तायडे, स्नेहल तायडे, समाधान करडीले, नितीन अढाव, सुमेध तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या प्रतिनिधींच्या जनजागृतीमुळे अनेकांचा लोकसहभाग या उपक्रमात वाढत आहे. 

लग्नसमारंभासह इतर समारंभात होत असलेली अन्नाची नासाडी बघता सर्व मित्र मंडळांनी बसून यावर चर्चा केली व या उपक्रमास सुरुवात केली. गत सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरुवातीला संस्थेचे प्रतिनिधी समारंभ ठिकाणी जाऊन विचारणा करायचे.सद्यस्थितीत अन्न शिल्लक राहिल्यास प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्या जातो, हे या उपक्रमाचे फलित आहे. 
- भगवान ढोले, प्रतिनिधी, राजरत्न संस्था, वाशिम.

Web Title: 'Come, get dinner, fill it all!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.