दिलासादायक : एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:29+5:302021-02-14T04:38:29+5:30
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले ...
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावी, तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणा-या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थीसंख्या आहे, तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थीसंख्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती वाढल्याचे दिसून येते. शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला नाही.
००००००००००००
शाळांमध्ये कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाला नाही.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम