शाळेचा गुरुपौर्णिमेनिमित्त स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:14+5:302021-07-27T04:43:14+5:30
रिसोड:- महिला उत्कर्ष प्रतिष्ठानद्वारा संचालित, लायसियम इंग्लिश (सी.बी.एस.सी )स्कूल, रिसोड येथे दिनांक २३ जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून ...
रिसोड:- महिला उत्कर्ष प्रतिष्ठानद्वारा संचालित, लायसियम इंग्लिश (सी.बी.एस.सी )स्कूल, रिसोड येथे दिनांक २३ जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून "गुरुपौर्णिमा " उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी १७५ विद्यार्थ्र्यांनी मातापित्याचे पाद्यपूजन केले.
विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे स्थान हे अनन्यसाधारण आहे .गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. माता, पिता , शिक्षक अशा अनेक व्यक्तिमत्वामधून ते गुरुतत्व आपण अनुभवत असतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले प्रथम गुरु म्हणजे माता-पिता यांचे पाद्यपूजन करण्यात आले .प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राचार्य कमलाकर टेंमधरे उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या १७५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी घरी बसूनच गुरुपौर्णिमा साजरी केली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.