वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:52 PM2018-10-16T15:52:30+5:302018-10-16T15:52:56+5:30

वाशिम: नगर पालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पार्किंग रेषा आखून, वेळेचे बंधन घातले आहे

Commercial Trouble due to Washim Municipal's parking conditions | वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: नगर पालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पार्किंग रेषा आखून, वेळेचे बंधन घातले आहे. यामुळे व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत आहेत. तथापि, नगर परिषदेच्या निर्णयाचे समर्थन व्यावसायिकांनी केले; परंतु या नियमांत शिथिलता आणण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबत मुख्याधिकाºयांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
व्यापारी संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पालिकेच्यावतीने शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्किंग नियम घालून दिले आहेत. ही चांगली बाब आहे; परंतु सद्यस्थितीत शहरांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पार्किंग नियम स्थगित ठेवावेत. तसेच किमान ३ मीटर एवढे अंतर सोडून कायमस्वरूपी पार्किंग असावी. लोडिंग, अनलोडिंग करीता व्यापाºयांसोबत चर्चा करून सोयीनुसार वेळ देण्यात यावा, पार्किंग लाईनच्या हद्दीत व रस्त्यावर कोणतेही किरकोळ विके्रते अथवा हातगाड्याही नसाव्या, चारचाकी व इतर वाहनांना पार्किंगमध्ये आणण्यासाठी सर्व रस्ते व पार्किंग मोकळे करून द्यावे आण सामान्य नागरिकांना पार्किंग कर्मचाºयांनी सभ्य वागणूक द्यावी, तसेच त्यांना गणवेश व ओळखपत्र द्यावे, अशा मागण्या व्यापारी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर वाशिम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकि शोर कोठारी, आनंद चरखा, मनीष मंत्री, भरत चंदनानी आदिंची स्वाक्षरी आहे.

Web Title: Commercial Trouble due to Washim Municipal's parking conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.