प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 02:43 PM2019-12-19T14:43:12+5:302019-12-19T14:43:16+5:30

राधा भगवान आढाव (वय २४ वर्षे) ही विवाहित महिला व तिचा प्रियकर सुरज विठ्ठल पवार (वय २४ वर्षे) या दोघांनी सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

commit suicide with love affair | प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित

Next

शिरपूर जैन (वाशिम) : येथील जुन्या आठवडी बाजार परिसरात भाड्याने असलेल्या घरात वास्तव्यास असलेल्या राधा भगवान आढाव (वय २४ वर्षे) ही विवाहित महिला व तिचा प्रियकर सुरज विठ्ठल पवार (वय २४ वर्षे) या दोघांनी सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, मृतक विवाहित महिला राधा आढाव हिला तिच्या पतीकडून दोन अपत्य आहेत. असे असताना तीचे सुरज पवार या युवकासोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले आणि ती सुरजसोबत परगावी निघून गेली. तिच्या मामाने व सास-याने या प्रकरणी शिरपूर पोलिसात फिर्याद देखील दाखल केली होती. दरम्यान, काही दिवसांनी राधा ही घरी परत आली व पती आणि मुलांसोबत वास्तव्य करायला लागली. अशात ती पुन्हा काही दिवसांपूर्वी घरून निघून गेली आणि १८ डिसेंबर रोजी गावात परतली.

आल्यानंतर तिने प्रथम आपली दोन्ही मुले गावातच राहणा-या सासू, सास-यांकडे नेऊन घातली; तर पती रात्रीच्या सुमारास शेतात रखवालीसाठी गेलेला होता. दुस-या दिवशी, १९ डिसेंबरच्या सकाळी मृतक तथा राधाचा प्रियकर सुरज पवार व राधा आढाव यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. राधाच्या सास-यांनी ही माहिती शिरपूर पोलिसांना कळविली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, बीट जमादार माणिकराव खानझोडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे पाठविला.

Web Title: commit suicide with love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.