वाशिम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:12+5:302021-06-16T04:54:12+5:30
खासदार गवळी पुढे म्हणाल्या की, शिवसेनेने यापूर्वीसुद्धा विविध विकासकामे केलेली आहेत. यापुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ...
खासदार गवळी पुढे म्हणाल्या की, शिवसेनेने यापूर्वीसुद्धा विविध विकासकामे केलेली आहेत. यापुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. जिल्ह्याच्या विकासाकरिता खासदार गवळी यांनी १२० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतील विकासकामांचा शहरातील विवेकानंद नगर (लाखाळा), काळे फैल (गोंदेश्वर), संत सावतामाळी मंदिर (चंडिकावेस), वाल्मीकनगर (हिंगोली नाका), महाराणा प्रताप चौक, चिंतामणी मठ (बाहेती गल्ली), शिवालय, संत सेना महाराज मंदिर, जुना बालाजी मंदिर (गणेशपेठ), महाकाली मंदिर, गव्हाणकर नगर, वाटाणेवाडी, इटाळी कब्रस्तान आदी विविध विकासकामांची रविवारी गवळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त शहरातील महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला हारार्पण करून, तसेच विविध ठिकाणी धार्मिकस्थळांचे पूजन करण्यात आले. माळी समाजाच्या वतीने संत सावतामाळी यांची प्रतिमा देऊन खासदार गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, रिसोड तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, रिसोड शहरप्रमुख अरुण मगर, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, उपशहर प्रमुख गणेश पवार, लक्ष्मणराव इंगोले, साईदास वानखेडे, दीपक भांदुर्गे, बालू माल, शशिकांत पेंढारकर, नगरसेवक नागोराव ठेंगडे, विनोद खंडेलवाल, राजू भांदुर्गे, शीतल इरतकर, कांचन मोहळे, कैलास गोरे, आशा सचिन मडके, अतुल वाटाणे, हेमलता इंगळे, बाळू मुरकुटे, राहुल तुपसांडे, बापू ठाकूर, आशाताई खटके, प्रभाकर काळे, बबलू खान, राजू जानीवाले, हिना मुबस्सीर कौसर, अजीज मेंबर, उमेश मोहळे, दिलीप जोशी, राजाभैय्या पवार, राजू धोंगडे, सुशील भिमजियाणी, नितीन उलेमाले, गजानन जोगदंड, समीर कुरेशी, सतीश खंडारे, दामूअण्णा इंगोले, काकडे महाराज, नितीन मडके, गिरीश शर्मा, चेतन इंगोले, अमोल मापारी, गणेश इंगोले, हुकूम तुर्के, मुकेश ठाकूर, चंद्रकांत खेलुरकर, केशव डुबे, ज्ञानेश्वर वाघ, संदीप दहात्रे, संतोष काळे, असलम, प्रदीप टाकळकर, अविनाश गव्हाणकर, गजानन भुरभुरे, विशाल खंडेलवाल, युवासेना प्रसिद्धीप्रमुख नारायण ठेंगडे, गुड्डु इढोळे, प्राचार्य शेवाळे, मोरे, इंगोले, दानमोळे, परिहार, काठोळे, साबळे, पाचरणे, पाटील, गणेश जोगदंड, बारक्या चोपडे, अनिल ताजणे, लक्ष्मण बढेल, तोताराम बढेल, रोहित बढेल, विठ्ठल ढगे, राम काळबोंडे, शाम ढवळे, विक्रम ढवळे, राजू लोखंडे, दादासाहेब लाव्होरे, नंदू देशमुख, संजय खेलुरकर, संजय काष्टे, गोपाल महाजन, सागर खरबळकर, प्रसिद्धीप्रमुख अशोक शिराळ, संजय खडसे, नंदू परळकर, देवेश पवार, नंदू पवार, रामदास गाडेकर, गजानन आंबेकर, संतोष काळे पाटील, दामोदर काळे आदींसह महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक व सर्व जाती धर्मांचे नागरिक उपस्थित होते.