वाशीम शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध = भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:15+5:302021-04-17T04:40:15+5:30

वाशिम शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबद्ध असुन पाटनी चौक ते अकोला नाका मार्गाचे आता दिवस पालटनार आहेत असे प्रतिपादन ...

Committed to the overall development of Washim city = lost spirit | वाशीम शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध = भावना गवळी

वाशीम शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध = भावना गवळी

googlenewsNext

वाशिम शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबद्ध असुन पाटनी चौक ते अकोला नाका मार्गाचे आता दिवस पालटनार आहेत असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी पाटणी चौक ते अकोला नाका सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

पाटणी चौक ते अकोला नाका व पोष्ट ऑफिस चौक ते गजानन महाराज चौक व लोनसुने यांच्या घरापर्यंत रस्त्याचे भुमिपूजन मंगळवार गुडीपाडवा दीनी खा.भावना गवळी यांच्याहस्ते कोरोनाच्या नियमाचे पालन करून पार पडले.

दोन वर्षांपासुन अनेक अडचणीतून मार्ग काढत अखेर शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्‍न मार्गी काढत पाटणी चौक ते अकोला नाका मार्गाचे सामाजिक अंतर राखत व कोरोनाच्या नियमाचे पालन करत पाच लोकांच्या उपस्थित खा.गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी,ॲड.सुरेंद्र बाकलीवाल, नगरसेवक भिम जिवनानी, नगरसेविका कुसुम गोरे,मापारी, ॲड. उंडाळ, अरूणराव सरनाईक, नगरसेवक प्रभाकर काळे आदि उपस्थित होते. ख़ासदार गवळी यांनी शहरात रस्ते विकासासाठी १२० कोटी रूपयांचा निधी विविध योजनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत आणला असून इतरही विकास कामे होणार आहेत. या विकासाकामामुळे स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

Web Title: Committed to the overall development of Washim city = lost spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.