शिक्षणतज्ञांनी साधला ग्रामस्थांशी संवाद
By ram.deshpande | Published: July 26, 2017 08:21 PM2017-07-26T20:21:07+5:302017-07-26T20:21:25+5:30
मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.
शिक्षणाशिवाय गरीबी दूर होणार नाही म्हणून पालक, शिक्षकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे, शाळेची उपस्थिती वाढवुन शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच शासनाच्या विविध योजना आदिवासी, अनुसुचीत जाती च्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे,त्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी तत्पर असावे, अनेक गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक आठ ते पंधरा दिवस येत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितल्यावरुन त्यांनी चिंता व्यक्त केली. येथील जिल्हा परिषदच्या शाळांनाही त्यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चवथ्या वर्गातील मुलांना जोडाक्षरे, बेरीज, वजाबाकी आली पाहिजे असे त्यांनी शिक्षकांना सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, घरकुल, शौचालये आदि कामाच्या दर्जा व सुधारणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त करुन प्रशासनाबाबत चिड व्यक्त केली. महाराष्ट्र बदलतो आहे असे म्हटल्या जाते, मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील गाव,तांड्यावर विकासाच्या बाबतीत बºयाच सुधारणा होणे बाकी आहे. बंजारा समाजातील बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि मागासलेपणा त्यांच्या गरीबीस कारणीभूत आहे. उसतोड कामगारांचा प्रश्न असो वा शेतात राबवणाºया मजूरांच्या मजुरीचा प्रश्न कायम आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी काही प्रकल्प राबविले पाहिजे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही असावे असेही त्यांनी म्हटले. राज्यातील १०० गावांना भेटी देवुन गरीबी बाबत आपण अहवाल लिहून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार असेही त्यांनी सांगितले. त्यांचे सोबत वाशिम येथील विठ्ठल जोशी, सत्यजीत कांबळे, कोल्हे व मानोरा येथील माणिक डेरे, संजय अलदर होते. माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या निवासस्थानी वाईगौळ येथे जावुन त्यांनी त्यांचेसोबत चर्चा केली.