वेबिनारद्वारे स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:36+5:302021-06-10T04:27:36+5:30
११ जून रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात पुणे येथील ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे, चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), ...
११ जून रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात पुणे येथील ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे, चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले मार्गदर्शन करणार आहेत. युवक-युवतींसाठी वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत एकूण ५२ मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, दहावी-बारावीनंतरच्या संधी, इतर विविध क्षेत्रांसंबंधी माहितीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता एकूण १२ व प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत उद्योजकता विषयक एकूण १२ असे वर्षभरामध्ये एकूण ७६ ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.