..म्हणे चोरीची नव्हे ‘मिसींग’ची तक्रार द्या!

By Admin | Published: December 13, 2014 12:29 AM2014-12-13T00:29:58+5:302014-12-13T00:29:58+5:30

लोकमत स्टिंग ऑपरेशन: किरकोळ गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ.

Complain is not stolen, 'Missing'! | ..म्हणे चोरीची नव्हे ‘मिसींग’ची तक्रार द्या!

..म्हणे चोरीची नव्हे ‘मिसींग’ची तक्रार द्या!

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यातील एक-दोन पोलिस स्टेशनचा अपवाद वगळता किरकोळ स्वरूपाच्या चोरीचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी पोलिस कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे ह्यलोकमतनेह्ण केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण मधुन उघड झाले. किरकोळ गुन्हे दाखल करून घेतल्यानंतर चोरीचा तपास करा.चार्जशिट तयार करा यासह ईतर भानगडीला बगल पोलीसांकडून दिल्या जाते. जिल्हयातील लोकमतच्या प्रतिनिधींनी सामान्य नागरिकांच्या मदतीने हे स्टींग ऑपरेशन केले.
मानोरा : नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे मानोरा पोलिस स्टेशन जिल्ह्यात ओळखले जाते. किरकोळ स्वरुपाची तक्रार घेउन जाणार्‍या नागरिकांना पोलिस स्टेशनच्या कर्तव्यावरील कर्मचार्‍यांकडून कोणत्या प्रकारची वर्तणुक दिली जाते आणि तक्रार नोंदविण्याबाबत कशी तत्परता दाखविली जाते, याची पाहणी करण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी मोबाईल चोरीला गेल्याची नव्हे तर हरविला असल्याची तक्रार द्या, असा सल्ला उपस्थित कर्मचार्‍याने दिल्याचे आढळून आले. येथील पोलिस स्टेशन कार्यालयात स्टेशन डायरीत कार्यरत काही कर्मचार्‍याकडून तक्रारकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले आहे. मानोरा पोलिस स्टेशनमध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये असे आढळून आले, की स्टेशन डायरीवर कार्यरत पोलिस कर्मचारी प्रकाश पडघान यांच्याकडे एका चोरीच्या घटनेची तक्रार आली. मानोरा येथील एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक हे तक्रार घेऊन आले होते. त्यांचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार करण्यासाठी ते आले होते.; परंतु स्टेशन डायरीत कार्यरत पोलिस कर्मचार्‍यांनी मोबाईल चोरीस गेल्याची नव्हे, तर मोबाईल हरविल्याचा अर्ज द्या, असा सल्ला दिला. मोबाईल हरविल्याबाबत डायरीमध्ये नोंद करून प्राध्यापकाला रवाना करण्यात आले.

Web Title: Complain is not stolen, 'Missing'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.