मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नायब तहसीलदारास जातीवाचक शिविगाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:01 PM2019-02-23T18:01:27+5:302019-02-23T18:01:54+5:30
मानोरा : मानोरा तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार परशराम झिंगाडू भोसले यांच्याविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून तक्रारकर्ते सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत (६५, रा.जनुना खु.) या इसमाविरूद्ध २१ फेब्रूवारीला अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार, सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत यांनी ११ आॅक्टोबर २०१८ ते २ फेब्रूवारी २०१९ च्या दरम्यान मानोराचे नायब तहसीलदार परशराम भोसले यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आणि सचिवालयाकडे तक्रार केली होती. त्यात जातीवाचक गुन्हेगारी वृत्ताची समाज असा उल्लेख असण्यासोबतच जातीवाचक शिविगाळ देखील करण्यात आली. दरम्यान, सदर तक्रार उलट टपाली मानोरा तहसील कार्यालयास प्राप्त होताच महाराष्ट्र शासनातर्फे फिर्यादी नायब तहसीलदार परशराम भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत या इसमाविरूद्ध कलम ५०० भादंवि तसेच अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने करित आहेत.