घरकुलासाठी केलेल्या तक्रारीची सरकार पाेर्टलद्वारे दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:48+5:302021-02-06T05:17:48+5:30
याची दखल सरकारने घेतली असून, याबाबत उचित कार्यवाही करावी, असे आदेश मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे. ...
याची दखल सरकारने घेतली असून, याबाबत उचित कार्यवाही करावी, असे आदेश मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
प्रवीण राठोड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, शिवनी येथे आमदरी ग्रामपंचायतामध्ये
माझे कुडीमातीचे घर आहे, मी रोज मजुरी करतो. कधी काम मिळते तर कधी नाही. मला राहायला घर नाही, त्यामुळे मला कोणत्याही योजनेतून घरकुल मिळावे, अशी मागणी राठोड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे, आपले सरकार पोर्टलवर केलीआहे. त्याची दखल राज्य सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाने घेतली आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी मानोरा यांना पत्र आले असून, याबाबत कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.
लाभार्थी यांचे नाव प्रपत्र ‘ब’ यादीमधे नाही, त्यामुळे लाभार्थीस प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ देता येत नाही. लाभार्थी यांचे नाव प्रपत्र ‘ड’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना विशेष बाब म्हणून लाभ द्यावा, अशा सूचना प्राप्त झाल्या असून, तसा प्रस्ताव पाठविला आहे.
- मोहन श्रुंगारे
गटविकास अधिकारी, पं. स. मानोरा