पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:43+5:302021-07-03T04:25:43+5:30
पशुचिकित्सा व्यवसायी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भागवतराव महाले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार ...
पशुचिकित्सा व्यवसायी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भागवतराव महाले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार लखन मलिक, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी यांना काही दिवसांपूर्वीच न्याय्य मागण्यांचे निवेदन देऊन संघटनेची भूमिका मांडली आहे. त्याबद्दल कर्तव्य म्हणून सर्वच लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पशुवैद्यकांच्या मागण्या मान्य करण्याबाबतच्या निवेदनाची पत्रे पाठवली आहेत. या पत्रानुसार पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात बदल करून सरळ सेवेने ८५ टक्के, पदोन्नतीने पदवीधर पशुवैद्यकांमधून १५ टक्के अशी तरतूद करणे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन गट अ पंचायत समिती स्तरावर निर्माण करणे, इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा कायम प्रवास भत्ता मंजूर करणे, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर घोषित करून विमा संरक्षण कवच व आवश्यक सेवेतील सुविधा मिळणे आदी मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाचा मार्ग निवडला असून लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदने देताना संघटनेचे पदाधिकारी डॉ. तिखे, डॉ. ठाकरे, डॉ. बाजड, डॉ. चौधरी, डॉ. भोयर, डॉ. ईढोळे, डॉ. वानखेडे, डॉ. कासदेकर, डॉ. खरात, डॉ. मोरे, डॉ. बोरकर, डॉ. दंडे आदी उपस्थित होते.