३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण; निधीची प्रतीक्षा !
By Admin | Published: May 16, 2017 07:35 PM2017-05-16T19:35:42+5:302017-05-16T19:35:42+5:30
वाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे.
ऑनलाइन लोकमत
वाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्याने राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी जलसंधारण मंत्र्यांकडे मंगळवारी केली.
वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध नसल्याने या विभागाकडून सिंचनाचे मोठे प्रकल्प करणे शक्य नाही. पाणी उपलब्ध साठा लक्षात घेता लघु सिंचन विभागाने एकूण ३२ प्रकल्पांचा सर्वे केला आहे. मात्र, सदर प्रकल्पांना ३२ लाख ७६ हजार ३०० रुपये निधीची आवश्यकता असल्याने आणि हा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने सर्वे पलिकडे काही होऊ शकले नाही. निधीअभावी ३२ प्रकल्पाचा शुभारंभ होणे शक्य नाही. या पृष्ठभूमीवर ३२ प्रकल्पांसाठी किमान ३२ लाख ७६ हजार ३०० रुपयांचा निधी राज्याच्या जलसंधारण विभागाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हर्षदा देशमुख यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे केली.