विहीरीचे काम पुर्ण करुनही अनुदान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:16 PM2018-05-23T14:16:48+5:302018-05-23T14:16:48+5:30
मानोरा : पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीरीअंतर्गत इश्वरचिठ्ठीव्दारे मंजुर झालेल्या विहीरीचे बांधकाम पूर्ण करुनही अनुदान मिळाले नाही.
मानोरा : पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीरीअंतर्गत इश्वरचिठ्ठीव्दारे मंजुर झालेल्या विहीरीचे बांधकाम पूर्ण करुनही अनुदान मिळाले नाही. रोजगार सेवक, ग्राम सेवक यांच्या उदासीन धोरणामुळे व प्रशासनाने कुठलीही दखल नघेतल्याने मी आर्थिक संकटात सापडलो आहे. याप्रकरणी चौकशी करुन मला अनुदान द्यावे अशी मागणी अभईखेडा येथील शेतकरी रमश बळीराम राऊत यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
शेतकरी राऊत यांनी तक्रारीत म्हटले की, मार्च २०१७ मध्ये विहीरीच्या कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली तर ४ मे २०१७ रोजी मीविहीरीचे खोदकाम सुरु केले. मग्रारोहयो अंतर्गत मजुरांचे मस्टर तयार करुन नियमाप्रमाणे काम केले. १० फुटापर्यंत खोदकाम केल्यानंतर रोजगार सेवक, ग्रामसेवक यांना मस्टर काढण्यासाठी विनतंी केली, मात्र नंतर करु, पुढे करु असे सांगुन काम केले नाही. शेवटी मी खाजगी सावकाराकडुन कर्ज काढुन विहीरीचे काम पूर्ण केले मजुरांना पैसे दिले मात्र माझ्या किंवा मजुरांच्या बँकखात्यात पैसे जमा झाले नाही. मला सांगितल्याप्रमाणे मी कागदपत्राची पुर्तता केली.तांत्रिक बाबी पुर्ण केल्या. वेळोवेळी रोजगार सेवक, ग्रामसेवक यांना भेटलो मात्र त्यांनी चालढकल केली, आतापर्यंत मला अनुदान मिळाले नाही. परिणामी मी कर्जबाजारी झालो आहे. याप्रकरणी चौकशी करुन न्याय द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.यासंदभात अभईखेडा येथील ग्रामसेवक हिवराळे यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळु शकली नाही.