एस.टी.त प्रवाशांकडून नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:45+5:302021-03-29T04:23:45+5:30
................. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन ...
.................
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानाचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
.................
जऊळका येथे प्लास्टिक बंदीचा फज्जा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होवू नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागातही नियमाची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
................
मेडशी येथे वाहतूक विस्कळित
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या मेडशी येथे मुख्य चाैकात वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. याठिकाणाहून जडवाहने धावत असून वळणमार्ग अद्याप निर्माण झाला नसल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे दिसून येत आहे.
...................
अरूंद रस्त्यावरून धावताहेत वाहने
वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून वाहनधारकांनी मंत्री पार्कजवळून जनता बँकेजवळ निघणाऱ्या रस्त्याचा पर्याय निवडला आहे; मात्र सदर रस्ता अरूंद असून दुतर्फा घरे असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात सापडला आहे.
..................
किन्हीराजात रुग्णांची झाली सोय
वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याला निती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका मिळाल्या. किन्हीराजालाही रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची सोय झाली आहे.
....................
मालेगावचे क्रीडा संकुल ओस
मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मैदानी खेळ बंद आहेत. यामुळे मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुल खेळाडूंअभावी ओस पडले असून शासनाने खेळांना नियमांच्या अधीन राहून परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.