लोक अदालत : ‘व्हॉटसअ‍ॅप कॉलिंग’द्वारे न्यायालयीन प्रकरणात तडजोड शक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:51 PM2020-12-09T16:51:18+5:302020-12-09T16:51:30+5:30

व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे पक्षकारांना तडजोड करणे यंदाच्या राष्ट्रीय अदालतीमध्ये शक्य होणार आहे.

Compromise possible in court case through 'WhatsApp calling'! | लोक अदालत : ‘व्हॉटसअ‍ॅप कॉलिंग’द्वारे न्यायालयीन प्रकरणात तडजोड शक्य !

लोक अदालत : ‘व्हॉटसअ‍ॅप कॉलिंग’द्वारे न्यायालयीन प्रकरणात तडजोड शक्य !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे पक्षकारांना तडजोड करणे यंदाच्या राष्ट्रीय अदालतीमध्ये शक्य होणार आहे. या विशेष सुविधेचा लाभ वकिलांनी पक्षकारांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिक व बाहेर गावाचे पक्षकार हे त्यांचे न्यायालयात उपस्थित वकिलांच्या समक्ष, वकिलांच्या किंवा कर्मचारी यांच्या फोनवर संपर्क साधून पॅनेल सदस्यांशी तडजोडबाबत बोलू शकतील व त्यांनी दिलेली संमती तडजोडीकरिता ग्राह्य धरण्यात येईल. या सुविधेमुळे पक्षकार आपल्या घरात बसूनही तडजोडीबाबत चर्चा करू शकतील. तरी याबाबत पक्षकारांपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी माध्यमांचा उपयोग करता येईल. या अनुषंगाने पक्षकारांनी वकिलांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामन्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे आपापसातील वाद तडजोडीने मिटविणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे सहभागी होवून आपापसातील वाद तडजोडीने सोडवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Compromise possible in court case through 'WhatsApp calling'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.