जिल्हा परिषदेच्या ४६ शाळांना स्वखर्चातून मोफत पुरविले संगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:23 AM2017-09-09T01:23:57+5:302017-09-09T01:24:06+5:30
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना हायटेक करण्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून येथील बेटर टुमारो फाउंडेशनने ४६ शाळांना संगणक संचासह शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प बेटर टुमारो फाउंडेशनचे सर्वेसर्वा वामनराव सानप यांनी सोडला आहे.
विवेकानंद ठाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना हायटेक करण्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून येथील बेटर टुमारो फाउंडेशनने ४६ शाळांना संगणक संचासह शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प बेटर टुमारो फाउंडेशनचे सर्वेसर्वा वामनराव सानप यांनी सोडला आहे.
खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस् थेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा फारसा उच्च नसतो. तसेच भौतिक सुविधा फारशा उपलब्ध नसतात, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. शासनाच्या विविध योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत आता भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यासोबतच रिसोड येथील बेटर टुमारो फाउंडेशनने स् थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना मोफत संगणक संच व अन्य साहित्य पुरविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या कामी वामनराव सानप यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानासोबत डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने एक नव्हे, तर तब्बल ४६ जिल्हा परिषद शाळांना संगणक संचासह शैक्षणिक साफ्टवेअर मोफत दिले आहे.
वामनराव सानप हे पुणो येथे अभियंता आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने त्यांनी सदर उपक्रम हाती घेतला आहे. एका वर्षात ४६ शाळांना संगणक संच व साफ्टेवअर भेट दिले.
यामध्ये रिसोड तालुक्यातील आगरवाडी, बोरखेडी, लोणी बु., चाकोली, मोहजा इंगोले, मांडवा, धोडप बोडखे, नावली, वाडी रायताळ, जवळा, किनखेडा, सवड, गोभणी, गोवर्धन, महागाव, खडकी सदार, किनखेडा, देगाव, मोप, भापूर, तर मालेगाव तालुक्या तील एरंडा, गिव्हा, धारपिंप्री, काळाकामठा, मेडशी वसारी, दुधाळा, केळी, कोळगाव, उमरावाडी, ब्राह्मणवाडा, भेरा, मैराळडोह यासह अन्य शाळांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटलची जोड देण्यासाठी व विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून बेटर टुमारो फाउंडेशनच्यावतीने शाळांना संगणक संच व शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळत असल्याचा आनंद आहे. यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना मोफत संगणक संच पुरविण्याचा मानस आहे.
- वामनराव सानप
अध्यक्ष, बेटर टुमारो फाउंडेशन, रिसोड.