ग्रामपंचायतीतील संगणक संच धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:26+5:302021-07-15T04:28:26+5:30
सर्व ग्रामपंचायतीचा कार्यभार संगणक प्रणालीद्वारे करण्याकरिता शासनाने विशेष पर्यत्न करून मोठ्या प्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ...
सर्व ग्रामपंचायतीचा कार्यभार संगणक प्रणालीद्वारे करण्याकरिता शासनाने विशेष पर्यत्न करून मोठ्या प्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक संगणक चालकाची नियुक्ती करण्यात आली. त्याला सर्व सोई उपलब्ध करण्यात आल्या. मासिक सभा, आमसभा, इतर कामे सर्व संगणकाद्वारे करण्यास सक्तीसुद्धा होती; परंतु काही गावात रेंज नसल्याच्या कारणाने संगणक संच धूळ खात आहे, तर काही संगणक ग्रामसेवकाकडे असल्याचे चित्र आहे. विविध योजनांचे शेतकऱ्यांचे आनलाईन अर्ज, जन्म मृत्यू प्रमापत्र, पीक विमा इतरही प्रमापत्र दाखले काढायची गरज होती; परंतु त्यांना बरेच दाखले खासगी ऑनलाईन सेंटरमधून काढावी लागले. ज्या ग्रामपंचायतीला संगणक संच मिळाला आहे अशा ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेटची व्यवस्था करावी, अशी जनतेची मागणी आहे.