शिक्षक, शिक्षकेतरांना संगणक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:10+5:302021-08-18T04:48:10+5:30
खचलेल्या विहिरीची मदत प्रलंबित वाशिम: तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने या विहिरींचे पंचनामेही ...
खचलेल्या विहिरीची मदत प्रलंबित
वाशिम: तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने या विहिरींचे पंचनामेही केले, परंतु वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत अद्यापही मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
------------------
वाशिम तालुक्यात १.४५ लाख लोकांना लस
वाशिम: तालुक्यात कोरोना प्रतीबंधक लसीकरणाला वेग आला असून, १७ ऑगस्टपर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण १ लाख ४५ हजार लोकांनी लस घेतली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात तालुक्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-----------------
सोयाबीन दरात घसरण सुरुच
वाशिम: सोयाबीनच्या दरातील घसरण सुरूच असून, पाच दिवसांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्ववत झाल्यानंतरही सोयाबीनचे दर अधिकाधिक ९००० रुपये प्रती क्विंटलपर्यंतच होते. गत १५ दिवसांत सोयाबीनच्या दरात जवळपास २ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे.