कृषीपंपांना वीज जोडणीसाठी सौर विद्यूत प्रकल्पाचा संकल्प हवेतच विरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:00 PM2019-12-11T16:00:49+5:302019-12-11T16:01:10+5:30

प्रत्यक्षात मात्र या महत्वाच्या विषयावर डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ या दोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत विशेष काहीच होऊ शकले नाही.

The concept of solar power project to connect electricity to agriculture was lost in the air | कृषीपंपांना वीज जोडणीसाठी सौर विद्यूत प्रकल्पाचा संकल्प हवेतच विरला

कृषीपंपांना वीज जोडणीसाठी सौर विद्यूत प्रकल्पाचा संकल्प हवेतच विरला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरातील कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी सौरविद्युत प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह अधिकारंयानी तालुक्यातील पाच बॅरेजस प्रक्षेत्रांची संयुक्त पाहणी करून सौर विद्यूत प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता; मात्र २ वर्षांपूर्वी याबाबत झालेली हालचाल पुढे मंदावत जावून संकल्प हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
वाशिम तालुक्यातील जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर व राजगाव बॅरेजेस प्रक्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊन सौरविद्युत प्रकल्पाला जमीन कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकते, तसेच सौरविद्युत प्रकल्पाद्वारे किती शेतकºयांच्या कृषीपंपांना विद्युत जोडणी देता येणे शक्य होईल, याबाबत माहिती घेण्यात आली. सौरविद्युत प्रकल्प उभारणीसाठी बॅरेजस परिसरात शासकीय जमीन उपलब्ध होऊ शकेल का, याविषयी देखील यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी चर्चा केली.
बॅरेजस परिसरात सौरविद्युत प्रकल्प उभारणीविषयी सविस्तर अहवाल राज्यशासनाकडे सादर केला जाणार होता. त्यानुषंगाने महावितरण आणि जलसंपदा विभागाकडून तसे प्रयत्न देखील तेव्हा करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या महत्वाच्या विषयावर डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ या दोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत विशेष काहीच होऊ शकले नाही. यामुळे बॅरेजेस परिसरातील शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The concept of solar power project to connect electricity to agriculture was lost in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.