कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने वाढविली मालेगावकरांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:57 PM2020-09-30T16:57:06+5:302020-09-30T16:57:18+5:30
यापैकी ९० पेक्षा अधिक रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव तालुक्यात आतापर्यंत ४०० जणांना कोरोना संसर्ग झाला असून, यापैकी ९० पेक्षा अधिक रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने मालेगावकरांची चिंताही वाढवली आहे.
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा मालेगाव तालुक्यातच आढळला होता. त्यानंतरही कुकसा फाटा व मुंबईवरून परतत असलेल्या मालेगाव येथील सहा जणांना कोरोना संसर्ग झाला होता. यापैकी एका वयस्क रुग्णाचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात जवळपास २०० रुग्ण आढळून आले. यापैकी सहा जणांचा मृत्यू तर सध्या ३० जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात आतापर्यंत २६० जणांना कोरोना संसर्ग झाला असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर सध्या ६३ जणांवर उपचार सुरू आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तालुका वैद्यकिय अधिकाºयांसह चार वैद्यकिय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी व चमूची मालेगाव येथील कोविड केअर सेंटरला २४ तास सेवा सुरु आहे. कोविड केअर सेंटरला तपासणीसह घशातील स्त्रावही तपासणीसाठी घेतल्या जात आहेत. एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे नागरिक बिनधास्त असल्याचे बाजारपेठेतील गर्दीवरून दिसून येते.