पीकविम्याबाबतच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:36+5:302021-02-06T05:18:36+5:30
रिसोड तालुक्यात गत पावसाळ्यात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तथापि, अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ...
रिसोड तालुक्यात गत पावसाळ्यात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तथापि, अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मोप येथील शेतकरी भागवत दिगांबर नरवाडे, सतीश अशोकराव नरवाडे यांनी शुक्रवार १ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर पीकविमा तातडीने मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला प्रारंभ केला होता. उपोषण सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे यांनी पुढाकार घेऊन तहसीलदार, कृषी अधिकारी यांची भेट घेत शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, या मागणीसाठी चर्चा केली, तसेच प्रशासनाचा हलगर्जीपण व संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी कृषी अधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण सोडविण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी विमा मिळण्यासाठी तक्रारी केल्या होत्या, त्या शेतकऱ्यांचे खात्यात विमा कंपनीकडून पैसे जमा होण्यास प्रारंभ झाला आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत विमा कंपनीकडे तक्रार दाखल केल्या नाहीत. अशा शेतकऱ्यांचा अहवाल पंधरा दिवसांत तयार करून विम्याचा लाभ मिळावा, याकरिता विमा कंपनीकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल, असे लेखी पत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबाराव पाटील खडसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे तालुका प्रमुख कैलासराव खांनझोडे, अल्ताफ घनकर, नायब तहसीलदार बनसोड, कृषी सहायक भागवत पुंड, गरड विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होती.