मंगरुळपीर येथे चरित्र कथनमालेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:43+5:302021-04-23T04:43:43+5:30
या चरित्र कथनमालेत रामायणातील वेगवेगळ्या पात्रांचे चरित्र कथन १३ एप्रिल पासून सांगण्यात आले. तर २२ एप्रिल रोजी रामनवमीला समारोप ...
या चरित्र कथनमालेत रामायणातील वेगवेगळ्या पात्रांचे चरित्र कथन १३ एप्रिल पासून सांगण्यात आले. तर २२ एप्रिल रोजी रामनवमीला समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला विश्वमांगल्य सभेच्या कर्नाटक प्रांत संघटनमंत्री राधिकाताई कमविसदार, विदर्भ प्रांत अध्यक्षा अंजलीताई कोडापे,वाशीम जिल्हा संघटक वृषालीताई लक्रस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा बडगे यांनी केले.आर्या जलतारे हिच्या शक्तीगाणाने कार्यक्रमाची सुरुवात तर शेवट सानवी देशमुख हिच्या ध्वजप्रार्थना व जयघोषाने झाला. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वमांगल्य शाखा मंगरुळपीरच्या वतीने अनुराधा देशमुख व अस्मिता कुळकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाला नीता सरजोशी, अबोली घोडचर, माधुरी घोडचर,कल्याणी घोडचर,संपदा घोडचर,उज्वला घोडचर,जया दहातोंडे,अर्चना सांगाणी,अदिती महाजन,राधा कुळकर्णी, प्रियंका जलतारे,पल्लवी सुरडकर यांचे सहकार्य लाभले.तसेच तेजस जोशी,सुनीता बालेकर, नीलिमा बोरोडे,भाग्यश्री देशपांडे,मंजुषा लोळे,अपर्णा सोवळे,पूजा देशमुख,जानकी देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.