पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:40 PM2019-01-05T16:40:51+5:302019-01-05T16:41:15+5:30

दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

In the condition of drying wheat crop due to lack of water | पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके संकटात सापडली असून, दगड उमरा येथील १० शेतकºयांचे गहू पिक पाण्याअभावी सुकत असल्याने हे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
वाशिम जिल्ह्यात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस पडला. त्यात वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असताना दगड उमरा परिसरात वाशिम तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीला तुंडूब दिसणारे जलाशय आणि विहिरींची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. सुरुवातीच्या काळात पडलेल्या पावसाने जलाशय आणि विहिरींची पातळी वाढल्याचे पाहून दगड उमरा शिवारातील शेतकºयांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. त्यात हरभरा आणि गहू पिकाचे प्रमाण अधिक आहे. हरभरा पिकाला पाण्याची फारसी गरज नसल्याने हे पीक तरले; परंतु आता विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने गहू पिकाला पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांचे पीक अडचणीत आले आहे. त्यातच जनार्धन किसान पाठे, विठ्ठल निवृत्ती पाठे, शिवराम नामदेव पाठे, सतीश महादेव पाठे, संजय कुंडलिक पाठे, भागवत पाठे, प्रकाश दत्ता पाठे, निराकार माधव पाठे, नंदकिशोर पाठे, शांताबाई कुंभार या शेतकºयांचे गहू पिक, तर पाण्याअभावी सुकत चालले आहे. त्यामुळे या शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

Web Title: In the condition of drying wheat crop due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.