संत गाडगेबाबा पुतळा परिसर, आवार भिंतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:17 AM2021-02-18T05:17:37+5:302021-02-18T05:17:37+5:30

१५ फेब्रुवारी रोजी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, विधि सेनेचे सचिव अ‍ॅड. मनोज राठोड, ...

Condition of Sant Gadge Baba statue premises, yard wall | संत गाडगेबाबा पुतळा परिसर, आवार भिंतीची दुरवस्था

संत गाडगेबाबा पुतळा परिसर, आवार भिंतीची दुरवस्था

Next

१५ फेब्रुवारी रोजी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, विधि सेनेचे सचिव अ‍ॅड. मनोज राठोड, सरचिटणीस अमोल गाभणे, महिला सेनेच्या संगीता चव्हाण, मनसे सैनिक विठ्ठल राठोड, किशोर राठोड, प्रतीक कांबळे, बाळू विभुते, निखिल बुरकुले, देवीदास आढाव, अशोक शिंदे, सागर खरे, विमल राठोड, ईश्वर राठोड यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वाशिम शहरातील नंदीपेठ भागात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा पुतळा आहे, तर सभोवती आवार भिंत बांधलेली आहे. परंतु या पुतळ्याचे गत १० वर्षांपासून सौंदयीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पुतळ्यासभोवती बांधण्यात आलेल्या भिंतीचे सिमेंट उखडले आहे. खालील फरशाही खराब झाल्या आहेत. आजूबाजूच्या ग्रिल तुटलेल्या आहेत. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता व शिक्षण क्षेत्रात क्रांती केली. त्यांनी शिक्षण न घेताही अनेकांना शिक्षण व स्वच्छतेचे धडे दिले. अशा महापुरुषांच्या स्मारक व पुतळा परिसराची दुरवस्था झाली आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासह ग्रिल, भिंत व फरशाची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Condition of Sant Gadge Baba statue premises, yard wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.