आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्डसाठी अटी शिथिल कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:26+5:302021-09-19T04:42:26+5:30
आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला यांना पाठविलेल्या निवेदनात रंगराव धुर्वे यांनी असे म्हटले आहे की, आमचा आदिवासी, गोंड समाज हा ...
आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला यांना पाठविलेल्या निवेदनात रंगराव धुर्वे यांनी असे म्हटले आहे की, आमचा आदिवासी, गोंड समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. या समाजातील अनेक लोक अद्यापही जडीबुटी, वनौषधी विकून आपला उदरनिर्वाह करतात व त्यासाठी सतत भटकंती करीत असतात. त्यांचे वास्तव्य अद्यापही कापडी पालांतच असल्याचे दिसते. भटकंतीमुळे या समाजातील अनेक लाेकांच्या जन्म, मृत्यूची नोंदही प्रशासन दप्तरी होत नाही. त्यामुळे कोतवाल बुकाची नक्कल पुरावा म्हणून त्यांना मिळत नाही. अज्ञानामुळे जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्डसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांपासून हा समाज वंचित असल्याने या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही, ही बाब लक्षात घेत आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने राबवावी, अशी मागणी पं.स. सदस्य रंगराव धुर्वे यांनी केली आहे.