अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेल्या शेतमजूर कुटुंबियांची सांत्वनपर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:49 PM2018-08-24T13:49:49+5:302018-08-24T13:50:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : तालुक्यातील मोखड पिंप्री येथे शेतळ्यात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेल्या किसन चिचखेडे या शेतमजूर कुटुंबीयाची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी भेट घेवून सांत्वन केले.
मोखड पिंपरीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर व रस्त्याला लागूनच असलेल्या शेततळ्यात शुक्रवार १७ आॅगस्ट रोजी किसन चिचखेडे या शेतमजूराचे दोन अल्पवयीन मूलांचा पोहताना बुडून मृत्यू झाला. या घटनेची शिवसैनिकांना माहिती कळताच माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व शिवसेनेचे कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी मोखड या गावाला जावून किसन चिचखेडे या शेतमजूर कुटुंबीयाची भेट घेवून सांत्वन केले.
यावेळी उपतालुका प्रमुख राजु वानखेडे, उपशहर प्रमुख अनिल जाधव, कामरगाव सर्कलप्रमुख श्याम भगत पाटील, खेर्डा सर्कलप्रमुख संदिप राठोड, डिगांबर सुपलकर, मोखडचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे, पिंप्रीचे शाखाप्रमुख नितीन मोडक यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.