कोंडोली पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:35+5:302021-06-21T04:26:35+5:30
मानोरा : तालुक्यातील श्री क्षेत्र कोंडोली येथे अरुणावती नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात आलेल्या पुराने १० जून ...
मानोरा : तालुक्यातील श्री क्षेत्र कोंडोली येथे अरुणावती नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात आलेल्या पुराने १० जून रोजी वाहून गेला. १० दिवस उलटूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. १० जून रोजी रात्री आलेल्या पुराने पूल वाहून गेला. यामुळे कोंडोलीवरून मानोराकडे येणाऱ्या पारवा, मोहगव्हान, आसोला, आनंदवाडी या चार गावांचा संपर्क तुटला होता. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणेही यामुळे कठीण झाले आहे. या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटनी, तहसीलदार शारदा जाधव, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, बांधकाम विभागाचे अभियंता मालानी, घाटगे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; मात्र पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्याप 'जैसे थे' असून नागरिकांमध्ये यामुळे रोष व्यक्त होत आहे.