परस्परविरोधी तक्रार; १४ जणांविरूद्ध गुन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:47 PM2017-10-23T22:47:29+5:302017-10-23T22:52:39+5:30

रिसोड : पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून २३ आॅक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरूद्ध दिलेल्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे.

Conflicting complaint; Crime against 14 people! | परस्परविरोधी तक्रार; १४ जणांविरूद्ध गुन्हे !

परस्परविरोधी तक्रार; १४ जणांविरूद्ध गुन्हे !

Next
ठळक मुद्देनगरसेवकाचा समावेश जून्या कारणाहून वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून २३ आॅक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरूद्ध दिलेल्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे.
रिसोड शहरातील आसनगल्ली परिसरात वास्तव्यास असलेले जगन्नाथ नेमाडे यांच्या घरासमोर भाउबीजेच्या दिवशी सायंकाळी पंकज हलगे यांनी फटाके फोडल्यावरून शाब्दीक वाद निर्माण झाला होता. प्रकरण पोलिसांना तक्रार देण्यापर्यंत गेले होते. त्यातून सदर घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलिस स्टेशनला बोलविले होते. सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पोलिस स्टेशन समोर दोन्ही गटातील मंडळी जमली. यावेळी दोन्ही गटात सुरूवातीला शाब्दीक चकमक उडाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील १४ जणांविरूद्ध भादंवी कलम १४३, १४७, १४९, ३२३, १३५ नुसार गुन्हे दाखल केले. जगन्नाथ श्रावण नेमाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नगसेवक सागर डांगे, पंकज हलगे, सोनू हांडे, प्रदिप घायाळ, शंकर पत्तरवाळे, गणेश देशपांडे, सुरज चिपडे यांच्यावर गुन्हे दाखल केले तर मयूर अशोक हांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अ‍ॅड. कृष्णा आसनकर, जगन्नाथ  नेमाडे, किरण कंडाळे, बजरंग कोकाटे, चेैतन्य आसनकर, अशोक थोरात, हरिष नेमाडे यांचेविरोधात उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले. घटनेतील अशोक थोरात, सोनू  हांडे, पंकज हलगे या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित ११ आरोपी फरार झाले आहे. फरार आरोपींचा शोध रिसोड पोलीस घेत आहेत. सदर घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आमटे, जर्नाधन गिव्हे करीत आहेत. 

Web Title: Conflicting complaint; Crime against 14 people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.