अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 02:20 PM2019-07-27T14:20:24+5:302019-07-27T14:20:40+5:30

अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.

Confusion about the help of crop damage caused by heavy rainfall | अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: राज्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  वाशिम जिल्ह्यातही शेजमीन खरडण्याच्या, तसेच मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. पिकांच्या या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु या संदर्भातील अतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ३७५०० प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.
गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी झाल्याने राज्यात हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी खरडल्या, तसेच पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यातही १५ ते २० आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन खरडून गेली, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. महसूल व कृषी विभागाने या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण करून संयुक्त पंचनामा तयार केला. या पंचनाम्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ४.५९ कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. आता शासनाने गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या नुकसानापोटी आर्थिक मदत म्हणून शासनाने ४६ कोटी ४५ लाख ८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास २५ जुलैच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली; परंतु खरडून गेलेल्या किंवा वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानासाठी मदत, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ ६११.४४ हेक्टर क्षेत्रासाठीच शासनाने २ कोटी २९ लाख २९ हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे केवळ पीक नुकसानासाठी मदत मिळणार की नाही, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांना पडला आहे.

Web Title: Confusion about the help of crop damage caused by heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.