तंटामुक्त समितीच्या निवड सभेवरून गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:00+5:302021-09-02T05:29:00+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ऑनलाईन ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीवरून ...
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ऑनलाईन ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ उडाला. तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदासाठी नाव सुचविलेले असतानाही, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जुन्याच अध्यक्षांकडे जबाबदारी सोपविली, असा आरोप भरत पोधाडे यांनी केला.
जवळका रेल्वे येथील आधी कोरमअभावी तहकूब झालेल्या ग्रामसभेनंतर मंगळवार ३१ ऑगस्टला रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान पुन्हा ऑनलाईन ग्रामसभा घेण्यात आली. या सभेमध्ये तंटामुक्त अध्यक्ष निवडण्यासाठी सुचवलेल्या नावावर चर्चा करून अध्यक्ष निवडण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. नागेश अवचार यांनी स्वत:चे नाव सुचवले व सूरज अवचार यांनी त्या नावाला संमती देऊन कुणाचा विरोध आहे का? असे विचारले तेव्हा कोणीही विरोध दर्शविला नाही. काही वेळानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वीचे जुने अध्यक्षच तंटामुक्ती अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे सांगून सभा आटोपती घेतली. यावरून काही वेळ गोंधळही उडाला.