शिक्षक, कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याप्रती सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:28+5:302021-09-16T04:52:28+5:30
मानोरा : शासकीय सेवा बजावताना उत्कृष्ट कार्य केल्याप्रती तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने परिसरातील शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबर ...
मानोरा : शासकीय सेवा बजावताना उत्कृष्ट कार्य केल्याप्रती तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने परिसरातील शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबर रोजी सत्कार केला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली.
श्री शंकरगिरी महाराज सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मासुपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. ठाकरे, आप्पास्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. कव्हर, मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अनिल पवार, माजी केंद्र प्रमुख उषा देशमुख, आरोग्य विभागाचे डॉ.राजेंद्र मानके, शंकरगिरी महाराज संस्थानचे अध्यक्ष योगेंद्र देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकरराव भोयर, सरपंच सोनाली बबनराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखेडा ग्रामपंचायतीने यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट कर्मचारी व शिक्षकांच्या कामगिरीला काैतुकाची थाप मिळावी, या हेतूने त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. गावात ९७ टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक कोविड प्रतिबंधक चमूचाही सत्कार करण्यात आला. प्रा.भाऊसाहेब काळे, प्राचार्य ठाकरे, पोलीस निरीक्षक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील वासुदेव सोनोने, रणजीत जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत देशमुख यांनी केले, तर ग्रामसेवक अनिल सूर्य यांनी आभार मानले.
.......................
यांना करण्यात आले सन्मानित
कारखेडा येथील जि.प. शाळेचा माजी विद्यार्थी विश्वजीत सोळंके याच्यासह उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुंडलिक राऊत, उमेश हाके, प्रा.वसंत चव्हाण, विजय मनवर, श्यामकुमार वानखडे, प्रा.अनिस अन्सारी, प्रा.डॉ.सीमा केशवाणी, उत्कृष्ट तलाठी म्हणून एस.एस. राठोड, ए.पी. सावंगेकर, अरुण राठोड, ग्रामसेवक सुनील खाडे, विष्णू करसडे यांना सन्मानित करण्यात आले.