कँाग्रेसची मासिक सभा
By Admin | Published: July 3, 2014 11:23 PM2014-07-03T23:23:59+5:302014-07-04T00:04:54+5:30
जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने स्थानिक लाखाळायेथे मासिक सभा घेण्यात आली.
वाशिम : जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने स्थानिक लाखाळा स्थीत कमेस्ट भवन येथे मासिक सभा घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अँड.दिलीपराव सरनाईक तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख , अरविंद पाटील इंगोले, सोनाली जोगदंड, सुरेश इंगळे, अल्काताई मकासरे, किसनराव मस्के, राजुभाऊ चौधारी, गजाननराव ला.भाई भुके, दिपकराव भांदूर्गे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणातून अँड. सरनाईक यांनी तर प्रमुख पाहुणे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करीत कार्यकर्त्यांनो पक्ष कार्याला भिडण्याचे आवाहन केले. सदर सभेमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. तर मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आल्याचा ठराव किसनराव मस्के यांनी मांडला. यावेळी अबरार मिर्झा यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती सदस्य पदी इप्तेखार पटेल यांची नियुक्ती झाल्याबद्ददल कॉग्रेस कमेटीच्या वतीने देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्योती गणेशपूरे यांचा महिला जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी स्व.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर व महाराष्ट्राकरिता दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. दिलीप देशमुख, अँड. प्रकाश इंगोले, ङ्म्रावण कांबळे, सुभाष देवहंस, राजु वानखेडे, अँड.अंभोरे, सौ.ज्योती गणेशपूरे, वाय.के.इंगोले, हरिष चौधरी, आदींनी पक्ष संघटना मजबुत करण्याच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन परसराम भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंद्रजीत राजुरकर, यांनी केले. कार्यक्रमाकरिता गोपाल मानधने, अँड.प्रकाश इंगोले, इप्तेकार पटेल, निळकंठ गजभिये, अरविंद लाठीया, प्रकाश वायभासे, जगदीश बळी, प्रकाश राठोड, गजानन देवळे, प्रदिप इन्नाणी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.