कॉंग्रेस घेणार पोटनिवडणुकीचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:34+5:302021-09-22T04:46:34+5:30
००००००० जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस वाशिम : गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वाशिम ...
०००००००
जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस
वाशिम : गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, मूग, उडीदाची सोंगणी करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
०००००००
रस्ता कामामुळे वाहतुकीस अडथळा
वाशिम : पाटणी चाैक ते अकोला नाका यादरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. जुन्या जिल्हा परिषद इमारतीसमोरुन गेलेल्या पर्यायी रस्त्याने वाहने धावत आहेत. यामुळे त्या रस्त्यावर गर्दी वाढली आहे.
००००
जऊळका परिसरात सुविधांचा अभाव
वाशिम : जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील दलित वस्तीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी २१ सप्टेंबर रोजी केली.
०००००
छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक
वाशिम : वाशिम, रिसोड, मालेगाव यासह अन्य शहरांमध्ये छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर पाईप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष पुरवून हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी होत आहे.
००००
रोजगार सेवकांचे मानधन अनियमित !
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत रोहयोच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा पहिल्या आठवड्यात मानधन मिळत नाही. गत दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने ग्रामरोजगार सेवकांमधून रोष व्यक्त होत आहे.
००००००
‘एबी’ केबलमुळे चोरीस आळा
वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) विजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. वाशिम तालुक्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे केबल टाकण्यात आल्याने महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जे. तायडे यांनी मंगळवारी दिली.