अपुऱ्या पावसाचा परिणाम; उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:37 PM2018-03-09T17:37:53+5:302018-03-09T17:37:53+5:30
वाशिम: अमरावती विभागात गतवर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम यंदाच्या उन्हाळी पिक पेरणीवर झाला असून, मार्च महिन्याला सुरुवात झाली तरी, अद्याप १० टक्के क्षेत्रावरही उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही.
वाशिम: अमरावती विभागात गतवर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम यंदाच्या उन्हाळी पिक पेरणीवर झाला असून, मार्च महिन्याला सुरुवात झाली तरी, अद्याप १० टक्के क्षेत्रावरही उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने यंदा उन्हाळी पिके पेरण्याचे धाडस शेतकºयांनी केले नाही.
अमरावती विभागात गतवर्षी मुबलक पाऊस पडल्याने उन्हाळी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. एकूण पाच जिल्हे मिळून तब्ब्ल ७३२६९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक ६० टक्के प्रमाण हे भुईमुगाचे होते. तथापि, गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाल्याने विहिरी, तलाव आटले असून, शेतकºयांनी पिकांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे पिकांची पेरणी करून आणखी संकट ओढवून घेण्याऐवजी शेतकºयांनी पेरणीकडे पाठ केल्याचे दिसत आहे. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात ४१३६९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र सद्यस्थितीत केवळ १३४१ हेक्टरवर उन्हाळी पिके पेरण्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी १७०११ हेक्टरवर उन्हाळी पिकांचे क्षेत्र होते. ते प्रमाण यंदा सद्यस्थितीत केवळ १९४० हेक्टरवर आले आहे. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी ८६६३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात केव्ळ ३४२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात गतवर्षी ५०७८ आणि अमरावती जिल्ह्यात ११४८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. या जिल्ह्यांचा प्राथमिक पीक पेरणी अहवाल प्राप्त झाला नसला तरी, या दोन्ही जिल्ह्यांत अगदी नगण्य प्रमाणात उन्हाळी पिकांची पेरणी झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.